About us

disastergyan.com हि वेबसाईट तयार करण्यामागचे उद्दिष्ट

नमस्कार! आमच्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे !

आपत्ती व्यवस्थापन ह्या विषयाबाबत मराठी मध्ये कमी प्रमाणात लेखन उपलब्ध आहे. सर्वच माहिती आपल्याला मिळू शकत नाही. त्याकरिता आपल्याला प्रामुख्याने इंग्रजी व हिंदी भाषेत निर्मित साधनस्रोतांवर अवलंबून राहावे लागते. हि उणीव भरून काढण्यासाठी disastergyan.com हि वेबसाईट आपण तयार केली असून, आपत्ती व्यवस्थापन ह्या विषयी विद्यार्थी, नवोदित लेखक तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लेखनाकरिता सर्वांनाच प्रोत्साहन मिळावे व आपत्ती व्यवस्थापनाबाबत मराठीमध्ये जास्तीतजास्त लेखन निर्मिती व्हावी तसेच आपत्तींविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याचा हा प्रयत्न असून त्याकरिता हि वेबसाईट आपण तयार केली आहे. विविध आपत्तींमध्ये सामान्य लोकांना स्वतःचा बचाव कसा करावा, एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत काय करावे व काय करू नये ह्याबाबत ज्ञान असल्यास ते आपला तसेच इतरांचा जीव वाचवू शकतात आणि ह्याकरिता योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. लोकांना आपत्ती साक्षर बनवणे हि काळाची गरज आहे. ही वेबसाइट केवळ माहितीचा स्त्रोत नसून, आपत्ती व्यवस्थापनासंबंधित ज्ञान आणि संवादासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरेल. स्थानिक स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि समाजातील विविध घटकांना या विषयाची समज निर्माण करून देण्यासाठी हा उपक्रम निश्चितच मोलाचा ठरेल.